दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनात आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ही समर्थन दिले असून त्यांनी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित शेतकरी विरोधी कायदा मागे घेण्याची विनंती केली आहे. ही देशाच्या अन्नदाताच्या अधिकाराची लढाई आहे।त्यामुले आपलाही पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. जर मोदी यांनी हा शेतकरी विरोधी कायदा परत न घेतल्यास आपन ही दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी होऊ असा इशारा ही नाना पटोले यांनी दिला आहे.